Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeजळगावजिल्ह्यातील १२ अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह

जिल्ह्यातील १२ अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह

जळगाव/ कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/ पोलीस दक्षता लाईव्ह:-  राज्यात जळगावचे पोलीस दल यांची कामगिरी नेहमीच कौतुकास्पद राहिलेली आहे. त्यांचा कार्याचा गौरव होणे हे साहजिकच आहे.

जळगाव पोलीस दलातील १२ अधिकारी – अंमलदारांना महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक बोधचिन्ह तथा सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. त्यांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांसह पोलिस अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
पोलीस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल, प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक, शौर्य पदक जाहीर झाले. तसेच, पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस महासंचालकांचे बोधचिन्ह, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र सन-२०२२ वर्षाकरिता पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी जाहीर केले व बोधचिन्ह, सन्मानचिन्ह व प्रशस्थीपत्र प्राप्त प्रदान झालेल्या अधिकारी आणि अंमलदार यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.सन्मानचिन्ह प्राप्त पोलीस दलातील अधिकाऱ्यांचे पोलीस दक्षता लाईव्ह तर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या