Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याजिल्ह्यातील 1095 शिक्षकांच्या बदल्या 31मे पर्यंत; प्रा.शिक्षण अधिकारी संजयकूमार जावीर

जिल्ह्यातील 1095 शिक्षकांच्या बदल्या 31मे पर्यंत; प्रा.शिक्षण अधिकारी संजयकूमार जावीर

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह….

सोलापूर /जिल्हा प्रतिनिधी खंडेराव पाटील /पोलीस दक्षता लाईव्ह:- सोलापूर जिल्ह्यातील 1095 शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या 31 मे पर्यंत नवीन शाळेवर हजर होण्यासाठी आदेश देणार असल्याची माहिती व मे च्या वेतनासाठी विलंब होणार नाही असे शिक्षणाधिकारी संजयकूमार जावीर यांनी शिक्षक संघाला दिली.

शिक्षकांच्या वेतनासाठी जिल्ह्यातील शिक्षकांच्या भावना प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी व शासनाच्या ऑनलाईन बदल्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या झालेल्या बदल्यासंबंधी कार्यवाही जाणून घेण्यासाठी शिक्षक संघाच्यावतीने शिक्षक नेते शिवानंद भरले,तालुका अध्यक्ष सतीश वाले, पतसंस्थेचे संचालक शिवाजी पाटील अककलकोटचे अध्यक्ष अभिजीत सुर्डीकर, काशीनाथ विजापूरे , भिमराव पाटील, राजेंद्र केदार, बालाजी गुरव आदीनी शिक्षणाधिकारी संजय जावीर यांची भेट घेतली
सोलापूर जिल्ह्यातील एकूण 1095 शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली झाली असून त्यामध्ये संवर्गातील 1 चे 181, संवर्गातील 2 चे 98 व बदली पात्र असलेले 816 याप्रमाणे शिक्षकांचा समावेश आहे .1मे ते 15 मे पर्यत आंतरजिल्हा बदलीने जाणाऱ्या शिक्षकांना कार्यमुक्त व येणाऱ्यांना हजर करून घेण्याची प्रक्रिया तर 16 मे नंतर जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना नियुक्तीचे आदेश देऊन 31 मे पर्यंत नवीन शाळेवर हजर होण्यासाठी कार्यवाही करणार असल्याचे शिक्षणाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. तर मुख्यालयात शिक्षकांच्या वेतनासाठी असलेल्या कारकूनांची बदली झाल्याने 27 मे आले तरी कोणतीच कार्यवाही नाही मे चा पगार सुध्दा लांबणीवर जाणार असल्याने पगाराबाबतीत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या भावना तीव्र झाले आहेत हे ही निदर्शनास आणून देऊन तात्काळ कारकूनाची नेमणूक करावीअशी मागणी शिवानंद भरले यांनी केली असता लवकरच सोय केली जाईल असे शिक्षणाधिकारी जावीर यांनी सांगितले असल्याची माहीती जिल्हा संघाचे प्रवक्ते सिध्दाराम डोळ्ळे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या