Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeजळगावजेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रतन बारी यांचे मुंबई येथे निधन

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रतन बारी यांचे मुंबई येथे निधन

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव येथील शिरसोली रस्त्यावरील गायत्री नगरातील रहिवाशी, सामाजिक कार्यकर्ते, अखिल भारतीय बारी समाज विकास परिषदेचे राष्ट्रीय सचिव रतन शंकर बारी (वय 63 वर्ष, मूळ राहणार पहूर ता.जामनेर) यांचे आज पाच मे रोजी सकाळी मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या चार दिवसापासून त्यांच्यावर मुंबई येथील नायर हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. त्यांची अंत्ययात्रा उद्या शनिवारी 6 मे रोजी सकाळी 9 वाजता जळगाव येथील गायत्री नगरातील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा किरण, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

गेल्या चार दिवसापासून हॉस्पिटलमध्ये असलेले रतन भाऊ यांच्या पोटाचे ऑपरेशन झाले होते व मागील 24 तासापासून ते शुद्धीवर येत नव्हते. सर्व मित्रमंडळी, नातेवाईक व डॉक्टरांनी केलेले प्रयत्नांची शर्थ शेवटी आज सकाळी अपूर्ण पडली व रतन भाऊ कायमस्वरूपी इहलोकाच्या प्रवासाला निघून गेले. ते जळगावातील रेमंड कंपनीत नोकरीला होते. नोकरी व प्रपंच सांभाळून सुरुवातीपासूनच रतन भाऊंना सामाजिक काम करण्याची आवड होती. बारी यांच्या नेतृत्वाखाली 10 वर्ष सामूहिक विवाह सोहळे झालेत. समाजाची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी संत रूपलाल नागरी सहकारी पतसंस्था देखील रतन बारी यांनी स्थापन केली होती. त्यातून देखील अनेकांना रोजगारासाठी कर्ज त्यांनी उपलब्ध करून दिले. मध्यंतरी संस्था अडचणीत आल्यानंतरही रतन भाऊंनी ठामपणे अनेकांना मदत केली. त्यादरम्यानच्या काळात दोन वेळा त्यांनी जळगाव महानगरपालिकेची निवडणूक देखील लढवली. मात्र त्यात त्यांना थोड्याशा फरकाने अपयश आले. सन 2019 मध्ये जळगाव माजी मंत्री रामदास बोडखे व मनोज बारी यांच्या संकल्पनेतून अखिल भारतीय बारी-बारई -तांबोळी -चौरसिया व कुमरावत समाजाचे राष्ट्रीय महासंमेलन घेण्यात आले. या आयोजनात त्यांचा सिंहाचा वाटा होता.त्यांना आमच्या पोलीस दक्षता लाईव्ह टीमच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या