Tuesday, December 24, 2024
police dakshta logo
Homeक्राईमझाडाला ठिबकच्या नळ्याच्या बांधून अमळनेरात एकाची आत्महत्या....!

झाडाला ठिबकच्या नळ्याच्या बांधून अमळनेरात एकाची आत्महत्या….!

अमळनेर /प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- अमळनेर येथे निंबाच्या झाडाला ठिबकच्या नळ्या बांधून एकाने आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना अमळनेरात घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील प्रसिद्ध मुंदडानगर मधील रहिवासी मनोहर लोटन सोनार (वय ४५) यांनी पाण्याच्या टाकीजवळ निंबाच्या झाडाला ठिबकच्या नळ्या बांधून गळफास घेतल्याची घटना सकाळी घडली. नेमकी आत्महत्या का केली ? कारण काय होते ? ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुतण्या अजय सोनार याने पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या