Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमटीव्ही कलाकार आदित्यसिंह राजपुतचे निधन; बाथरूममध्ये आढळला मृतदेह....!

टीव्ही कलाकार आदित्यसिंह राजपुतचे निधन; बाथरूममध्ये आढळला मृतदेह….!

मुंबई/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- मुंबई सिनेकलावंत आणि मॉडेल आदित्यसिंह राजपूत सोमवारी (२२ मे) दुपारी अंधेरी भागातील अपार्टमेंटमधील बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात मंबई पोलिस बारकाईने तपास करीत आहेत.आदित्यच्या एका मित्राला आदित्य हा मृतावस्थेत आढळला, त्यानंतर त्या मित्राने आणि इमारतीच्या वॉचमॅनने आदित्यला रुग्णालयात नेले. रुग्णालयात आदित्यला मृत घोषित करण्यात आले.आदित्यच्या मृत्यूमागील कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.

आदित्य सिंह राजपूतने वयाच्या १७ व्या वर्षी मनोरंजन क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती. आदित्यचा जन्म दिल्लीत झाला. त्यांचे कुटुंब उत्तराखंड येथील आहे.आई,वडील, एक मोठी बहीण असं आदित्यचं कुटुंब आहे. आदित्य राजपूतच्या मृत्यूनं मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे. ‘स्प्लिट्सविला’ या शोमध्ये आदित्य सिंह राजपूतने काम केले होते. तसेच त्याने काही जाहिरातींमध्ये सुद्धा काम केले होते.
अभिनेता आदित्य सिंह राजपूत हा त्याच्या अंधेरी भागातील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या मृत्यूचा तपास सुरू आहे, अशी माहिती एका वृत्तसंस्थेला मुंबई पोलिसांनी दिली आहे.आदित्य हा सोशल मीडियावर सक्रिय होता. तो वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि रिल्स सोशल मीडियावर शेअर करत होता. त्याला इन्स्टाग्रामवर 520K फॉलोवर्स आहेत. आदित्यने काल इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होती. या फोटोवर ‘संडे फंडे विथ बेस्टी’,असे लिहिले होते. राजा, मॉम अँड डॅड: द लाईफलाईन लव्ह, लव्हर्स अशा चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं होतं. तसेच राजपुताना, लव्ह, कोड रेड, बॅड बॉय या मालिका आणि शोमध्ये देखील त्यानं काम केलं होतं.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या