Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्याठाण्यात कंटनेर- एसटीची जोरदार धडक, वाहकांसह महिला प्रवासी जखमी

ठाण्यात कंटनेर- एसटीची जोरदार धडक, वाहकांसह महिला प्रवासी जखमी

ठाणे/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- मुंबईत गेल्या आठवड्यापासून संततधार सुरू आहे.पावसामुळे रस्त्यावर अनेक अडचणींना वाहन धारकांना सामोरे जावे लागत आह. सकाळी पाचच्या सुमारास एसटीची कंटेनरशी धडक झाली. एसटी महामंडळाच्या ठाणे ते बोरीवली जाणाऱ्या बसची एका कंटेनरशी धडक झाल्याने कंडक्टरसह दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना ठाणे – घोडबंदर इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली.

या घटनेत कंडक्टर आणि एका महिला प्रवाशाला गंभीर स्वरुपाची दुखापत झाल्याने त्यांना कळवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस ( क्र. एमएच १४ बी.टी.१४८९ ) ठाणे एसटी बस डेपो येथून बोरवली येथे जात असताना तिची धडक एका कंटेनरशी झाल्याने एसटीचा पुढील भाग चेपला गेला. या अपघातात चालक संदीप पाटील ( वय 37 ) आणि वाहक अमर परब ( वय 38 ) यांच्यासह एक महिला प्रवासी जखमी झाली. जखमींना कळवा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. एसटीत नऊ प्रवासी प्रवास करीत होते. त्यात चार महिला आणि पाच पुरुष प्रवासी प्रवास करीत होते. पहाटे साडे पाचच्या सुमारास हा अपघात घडला असून अपघातानंतर कंटेरन चालक घटनास्थळावरुन पळून गेल्याची माहीती सूत्रांनी दिली. या बसमध्ये नऊ प्रवासी होते. अपघातात वाहक अमर परब ( रा. भांडुप ) आणि डोंबिवली आयरे गाव येथे राहणाऱ्या महिला प्रवासी गीता कदम ( वय ४१ ) यांच्या दोन्ही पायांना फ्रक्चर झाले असून त्यांना कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या