Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याडीजे चा कर्कश आवाज..! केंद्रप्रमुखचा करुण अंत.

डीजे चा कर्कश आवाज..! केंद्रप्रमुखचा करुण अंत.

अहमदनगर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- श्रीगोंदा-( जि. अहमदनगर ) जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील नारायण आश्रमचे केंद्रप्रमुख असलेल्या शिक्षकाचा डीजेच्या कर्कश आवाजाने मृत्यू झाला. डीजेच्या आवाजाने त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. महिनाभर त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. अखेर शनिवारी (दि. ६) मे रोजी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिक्षक अशोक बाबुराव खंडागळे (वय ५८) असे मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. ते कौडाणे (ता. कर्जत) येथे गेले होते. तेथे डीजेच्या आवाजाने त्यांना त्रास होऊ लागला. त्यातच ते कोमात गेले. महिनाभर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, त्यांची झुंज अपयशी ठरली. शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर पार्थिवावर कोडाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष संदीप मोटे, शिक्षक नेते गजानन ढवळे, अशोक आळेकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली. अशोक खंडागळे यांनी ज्ञानदानाचे काम अतिशय प्रामाणिकपणे केले. 9 में रोजी ते सेवानिवृत्त होणार होते. त्यानिमित्त शिक्षकांनी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित केला होता.त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या