Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeजळगावडॉ.अमृता व डॉ.शंतनू यांच्या विवाह सोहळ्यास मुख्यमंत्र्यांसह चार मंत्री शहरात दाखल..

डॉ.अमृता व डॉ.शंतनू यांच्या विवाह सोहळ्यास मुख्यमंत्र्यांसह चार मंत्री शहरात दाखल..

जळगाव/कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे दुपारी साडेबाराच्या सुमारास जळगावात दाखल झाले आहेत; ते चोपडा तालुक्याचे माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या घरच्या विवाहाला हजेरी लावणार आहेत.हा लग्न सोहळा एम.जे.कॉलेजचे एकलव्य क्रीडा संकुल मैदानावर सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी संपन्न होत आहे.

आमदार सौ.लताताई सोनवणे तसेच माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या कन्येचा ( डॉ.अमृता चंद्रकांत सोनवणे रा.सुजदे व डॉ.शंतनू हरिभाऊ सपकाळे रा.मस्कावद ता.रावेर ) आज हा देखणा विवाह सोहळा आहे,त्यासाठी नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासह चार ते पाच मंत्री शहरात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार,खनिकर्म मंत्री ना.दादा भुसे हे देखील जळगावात आले आहेत. ग्रामविकास,पंचायत राज व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील,आमदार चिमणराव पाटील यांच्यासह इतर मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांचे विमानतळावर त्यांचे स्वागत केले.

या लग्न सोहळ्याचे आमदार सौ.लताताई , चंद्रकांत अण्णा सोनवणे तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हा.चेअरमन शामकांत सोनवणे, माजी महापौर सौ.राखीताई सोनवणे, माजी नगरसेवक नरेंद्र बळीराम सोनवणे, सौ.अनिता सोनवणे, डॉ.किरण सोनवणे आणि सौ.रुपाली सोनवणे, गं.भा. सुमनबाई बळीराम सोनवणे,डॉ.गौरव सोनवणे हे निमंत्रक आहेत.विविध क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित मंडळी नव दाम्पत्यांना शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या