सोलापूर /जिल्हा प्रतिनिधी खंडेराव पाटील /पोलीस दक्षता लाईव्ह:- कासेगाव तालुका पंढरपूर येथील सेवानिवृत्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक अजित कोतवाल यांचा 75 वा अमृत महोत्सवी वाढदिवस त्यांच्या तीन मुली आणि जावयाने मोठ्या उत्साहात साजरा केला.सांगली जिल्ह्यातील नागज गावचे रहिवासी १९७५ साली कासेगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांनी कासेगाव तसेच पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य केले.त्यांचे अनेक विद्यार्थी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कृषी, न्यायिक व वैद्यकीय अशा अनेक क्षेत्रात विविध पदावरती कार्यरत आहेत. तत्कालीन परिस्थितीत गुरुजींनी आणि बाईंनी अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्यापरीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे धोरण अवलंबले होते, त्यामुळेच कासेगाव व कासेगाव पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना कोतवाल गुरुजी विषयी आजही आदर असल्याची भावना जिल्हा परिषदेचे सदस्य वसंतराव देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत त्यांच्या भावना व्यक्त केल्या. वडिलांचा 75 वी अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन रेश्मा, आशा, परवीन व जावई इकबाल शमशुद्दीन मुलानी, शकील शमशुद्दीन मुलांनी नयीम बादशहा वडगावकर सर्व नातवांनी केले.
या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती विजयसिंह बाळासाहेब देशमुख व प्रशांत अण्णासाहेब देशमुख उपस्थित होते. तसेच बादशहा वडगावकर, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब शेख, गप्पूर जमादार, पितांबर कापसे, एड. सुभाष देशमुख, तैमूरशहा इनामदार, शामराव खिलारे, प्रा.संतोष गंगथडे,प्रा. सुनील गवळी, दादासाहेब गावंदरे, प्रा. डॉ.बळवंत,प्रा.दत्ता खिलारे,अल्ताफ शेख, आप्पा साखरे,, नवनाथ खिलारे भाऊसाहेब देशपांडे, ताजुद्दीन मुलानी,जाकिर मुलानी, सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रसाळ गुरुजी, पिसे गुरुजी नागज,दौंड गुरुजी पाचेगाव. तसेच कासेगाव व पंचक्रोशीतील गुरुजींचे सर्व आप्तेष्ट पाहुणे , मित्रपरिवार विध्यार्धी गण मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.परवीन वडगावकर यांनी केले तर आलेल्या सर्वांचे आभार इकबाल मुलांनी यांनी मानले.