Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यातोतया वनाधिकाऱ्याने नोकरीचे आमिष दाखवून तरुणास फसविले

तोतया वनाधिकाऱ्याने नोकरीचे आमिष दाखवून तरुणास फसविले

चाळीसगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह’- चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील रहिवासी व्यक्तीवर वन अधिकारी असल्याचे सांगत तोतयेगिरी केली म्हणून गुरुवारी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता या तोतयाने एका तरुणाला नोकरीचे आमिष दाखवून एक लाख रुपयांची फसवणूक केल्याचीही घटना उघड झाली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन रवींद्र पगारे (रा. बहाळ ता. चाळीसगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने वन अधिकारी सांगून एका शाळेत वह्या वाटपाचा कार्यक्रम घेतला होता. मात्र वन विभागाला माहिती मिळाल्यावरून त्याच्यावर कारवाई करीत वन परिक्षेत्र अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आता एका तरुणानेही शुक्रवारी २१ रोजी दोन वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे. गणेश भगवान रणदिवे (वय २३, रा. देवळी ता. चाळीसगाव) या तरुणाने फिर्याद दिली आहे. १८ ऑगस्ट २०२० पासून आजपावेतो संशयित व्यक्ती नितीन पगारे हा नोकरी लावून देतो असे आमिष देत होता. त्यासाठी त्याने दोन वेळा ५० हजार म्हणजेच एकूण एक लाख रुपये तरुणाकडून घेतले. संशयिताने तरुणाच्या नातेवाईकांना नेहमी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र नोकरी काही लागलीच नाही त्यामळे संशयित नितीन पगारे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यानुसार मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश मांडोळे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या