Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यादक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रभारी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली निराधार अनुदान समितीची दुसरी सभा

दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रभारी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली निराधार अनुदान समितीची दुसरी सभा

सोलापूर /जिल्हा प्रतिनिधी/ पोलीस दक्षता लाईव्ह:- सोलापूर  (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रभारी तहसिलदार राजशेखर लिंबारे यांना जिल्हाधिकारी सोलापूर यांनी प्रभारी तहसिलदार दक्षिण सोलापूर म्हणून अति कार्यभार सांभाळण्यासाठी दिलेले आहे. दिनांक १५ मे २०२३ रोजी संजय गांधी निराधार अनुदान समितीची सभा आयोजित करुन सभेमध्ये एकूण २२८ प्रकरणे मंजूर केलेली आहेत. त्यानंतर दिनांक १७ जुलै २०२३ रोजी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना संगायो या शाखेतील सर्व प्रकरणे तपासणी करुन दुस-या सभेसाठी सुचना देवून तसेच १७ जुलै २०२३ रोजी संजय गांधी निराधार योजनेचे ८४ लाभार्थी, श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्तीवेतन योजनेचे ८१, राष्ट्रीय विधवा योजनेचे ३८, इंगायो राष्ट्रीय अपंग २, राष्ट्रीय वृध्दापकाळ योजनेचे ४७ असे एकूण २५२ पात्र लाभार्थ्यांचे प्रकरणे मंजूर करण्यात आलेली आहेत.२ महिन्यात संगायो निराधार अनुदान समितीच्या बैठकीत एकुण ४८० प्रकरणे मंजूर करुन लाभार्थ्यांना दिलासा देण्याचे कामकाज करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे एकूण १४ प्रकरणे देखील मंजूर करण्यात आलेले आहेत. संजय गांधी योजना बैठकीस संगायो नायब तहसिलदार दाबडे, अव्वल कारकुन परवीन रंगरेज, महसूल सहाय्यक कुलकर्णी एस. एल, सोनवणे सुधीर हे उपस्थित होते. सदरकामी कोणत्याही एजंटशी अथवा मध्यस्थाशी संपर्क न करता थेट संगायो शाखा दक्षिण सोलापूर येथे बँकेचे पासबुक, आधारकार्ड, व पासपोर्ट साईजचे फोटो आणून नोंदणी करण्यात यावे. असे आवाहन संगायो नायब तहसिलदार आरती दाबडे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या