Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeजळगावदहावी-बारावीतील गुणवंतांचा सत्कार समारंभ

दहावी-बारावीतील गुणवंतांचा सत्कार समारंभ

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव-जनमत प्रतिष्ठान या संस्थेच्यावतीने दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या गुणवंताचा सत्कार दरवर्षीप्रमाणे वर्ष पाचवा जनमत प्रतिष्ठानकडून 10 व 12 वी 75 % पेक्षा जास्त मार्क 23 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा डॉ.सुनील महाजन जुनिअर कॉलेज मेहरूण येथे मोठ्या उत्साहात पार पडला. मोबाईलच्या आहारी न जाता आजच्या पिढीने चौफेअर पुढे जाऊन करिअरचे क्षेत्रात पुढे जायला हवा असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये प्रमुख शहराच्या महापौर जयश्री महाजन ,निशा पवार, हभप माईसाहेब पाटील कीर्तनकार , नगरसेविका नीता सोनवणे, बी.एस.निकम मुख्याध्यापक मीराचे पळासखेडा,जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले ,प्रगती शाळेच्या मुख्याध्यापिका, पालीवाल ,भारती काळे, प्रा. विजय वानखेडे,ललित धांडे , कैलास न्यांती, श्रेयस वाणी यांची उपस्थिती लाभली. सूत्रसंचालन अशोक पारधे यांनी केले असे तुषार वाघुळदे यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या