Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमदारूच्या नशेत वृद्ध व्यक्तीस जोरदार मारहाण

दारूच्या नशेत वृद्ध व्यक्तीस जोरदार मारहाण

अमळनेर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यात मारहाणीच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुतण्याने दारूच्या नशेत वृद्ध काकाला विटेने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील प्र. डांगरी येथे घडली. याप्रकरणी मारवड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी याबाबत दिलेली अधिक माहिती अशी की, महादू शिवराम कोळी (वय ६०) रा. प्र. डांगरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते घराच्या ओट्यावर बसले असताना त्यांचा पुतण्या विलास सोनू कोळी हा दारूच्या नशेत आला व त्यांना खाली ओढून शिवीगाळ करत विटेने नाकावर, तोंडावर, मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच त्यांच्या पत्नी, मुली आणि बहिणीस अश्लील शिवीगाळ करत पोलिसांत तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी फिर्यादीला दिली. ते गंभीर जखमी झाल्याने त्यास कुटुंबीयांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचार झाल्यानंतर त्यांनी मारवड पोलिसात तक्रार दिली आहे.विलास सोनू कोळी याच्याविरुद्ध भादवि कलम ३२६, ३२४, २९४, ५०४, ५०६ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या