Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeक्राईमदिंडोरी उपविभागीय अधिकारी (प्रांत) निलेश अपार यास तब्बल ४० लाखांची लाच स्वीकारताना...

दिंडोरी उपविभागीय अधिकारी (प्रांत) निलेश अपार यास तब्बल ४० लाखांची लाच स्वीकारताना एसीबीने केली अटक

नाशिक/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील अनेक लाचखोरांवर एसीबीने कारवाई केली आहे. आता आणखी एक मोठा मासा एसीबीच्या गळाला लागला आहे. दिंडोरी उपविभागीय अधिकारी (प्रांत) निलेश अपार हा तब्बल ४० लाखांच्या लाच प्रकरणात एसीबीच्या हाती लागल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

एका खासगी कंपनीची जागा अकृषक (एनए) करुन देण्यासाठी निलेश अपारने तब्बल ४० लाख रुपयांची लाच मागितली होते. याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ,एसीबीला माहिती मिळताच एसीबीने सापळा रचून अपार याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. सध्या अपारची एसीबीच्या पथकाकडून चौकशी सुरु आहे. दरम्यान, 23 नोव्हेंबर 2023 रोजी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदाची जबाबदारी शर्मिष्ठा वालावलकर यांनी स्वीकारल्यापासून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारी आणि लाचखोर यांच्याविरुध्द धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत नाशिक विभागात सुमारे 90 गुन्हे दाखल करून तब्बल सुमारे 130 आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या