Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्यादिव्यांग बांधवांना इलेट्रिक सायकल आणि साहित्याचे वाटप

दिव्यांग बांधवांना इलेट्रिक सायकल आणि साहित्याचे वाटप

पुणे/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- दिव्यांग बांधवांना सशक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाच्या माध्यमातून दिव्यांग जनांना दिल्या जाणाऱ्या साहित्याचे आज वाटप केले. केंद्रीय सामाजिक मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार यांच्या मान्यतेने आणि माझ्या पुढाकारातून हा उपक्रम थेरगाव येथे राबविण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत पिंपरी, चिंचवड, मावळ, कर्जत, पनवेल आणि खालापूर या सहा विधानसभा मतदारसंघात या साहित्याचे वाटप केले गेले. दिव्यांगांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्याच्या उपक्रमाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेरगाव येथेच केली. यावेळी दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक सायकल देण्यात आली. यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघातील २७१ लाभार्थ्यांना विविध साहित्याचे वाटप केले गेले. सहा विधानसभा मतदारसंघामध्ये राबवण्यात आलेल्या या शिबिराच्या माध्यमातून गरजू दिव्यांगांना हे विविध साहित्याचे वाटप केले जात आहे. अंधांसाठी काठी, कर्णबधिर व्यक्तींसाठी कानाचे मशीन, व्हील चेअर, टॉयलेट भांडे आणि इतर साहित्य देण्यात आले. दिव्यांग बांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हा कार्यक्रम पार पडला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या