Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यादेवस्थान इनाम हक्क परिषद यशस्वी; गुरव बांधव आणि तज्ज्ञांची उपस्थिती

देवस्थान इनाम हक्क परिषद यशस्वी; गुरव बांधव आणि तज्ज्ञांची उपस्थिती

सोलापूर/ जिल्हा प्रतिनिधी खंडेराव पाटील/पोलीस दक्षता लाईव्ह:- राष्ट्रीय गुरव महासंघाने आयोजित केलेली देवस्थान इनाम हक्क परिषद पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात पार पडली. महाराष्ट्रातून मंदिर ट्रस्ट, आणि इनाम जमिनी याच्या अडचणींनी त्रस्त समाज बांधव, इनाम विषयातील राज्यभरातील तज्ञ आणि ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रतापराव गुरव होते. प्रस्तावित इनाम खालसा कायदा बनण्यापूर्वी गुरव समाजाच्या अडचणी आणि मागण्या कायदा बनवणाऱ्या समितीसमोर मांडल्या जाव्यात त्यासाठी विचार मंथन करण्यासाठी इनाम हक्क परिषद लावावी अशी संकल्पना महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांनी मांडली. त्यानुसार मुख्य निमंत्रक डॉ.नितीन ढेपे आणि योगिता ढेपे यांनी परिषदेचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून शेकडो बांधवांनी प्रतिसाद दिला. नियोजन सुरळीत व्हावे यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक केली होती. तरी पण सभागृहाची क्षमता एकशे वीस असताना दीडशेच्या वर लोकांनी उभे राहून संध्याकाळी सहापर्यंत सक्रिय सहभाग नोंदवला. सर्व कायदेशीर आणि किचकट मुद्दे मन लावून समजावून घेत होते. प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, कार्याध्यक्ष मल्लिकार्जून गुरव, उपाध्यक्ष गुंडेराव पावशेरे, अनंत पाटील , गणेश फुलारी आणि रवींद्र क्षिरसागर यांनी या आयोजनात मोलाची कामगिरी बजावली. ॲड घुगे, ॲड.मुकुंद आगलावे, ॲड.सुरेश कौदरे, ॲड. सुमती पाटील, ॲड.राम मंदिर कायद्याचे आणि देवस्थान इनाम कायद्याचे गाढे अभ्यासक रवींद्र गुरव, शिवाजीराव गुरव सातारा निवृत्त महसूल अधिकारी, गणेश सुरडकर संभाजीनगर, बालाजी गुरव, अविनाश गुरव बीड, वकील प्रिया गुरव, मठ मंदिर आयाम विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्रातील कार्यवाह मनोहर ओक आदी वक्त्यांनी या कायदेशीर आणि किचकट विषयाची सुलभ मांडणी केली.अनेक समाज बांधवांनी त्यांच्या इनामी जमिनी आणि ट्रस्ट याबद्दल चाललेल्या खटल्यांच्या फाईल आणल्या होत्या. त्यांच्या प्रश्नांना तज्ञ लोकांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला न्यायाधीश घुगे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. राष्ट्रीय गुरव महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मल्लिकार्जुन गुरव, राष्ट्रीय सचिव गजानन सुरडकर, राष्ट्रीय महिला अध्यक्षा अनुपमा गुरव, कोल्हापूरचे धनाजी गुरव, सहदेव गुरव, डॉ. प्राचार्य तुकाराम बिराजदार जळगाव , ज्येष्ठ पत्रकार, संपादक डॉ राजेंद्र वाघमारे पुणे, शशिकांत जिद्दिमनी, भानुदास पानसरे, धनश्री तडवळकर, सुनीता गुरव, वंदना गुरव, सुजाता गुरव,मीना सोनवणे,ज्योती गुरव, विमल गुरव, समाधान बेद्रे, राजेंद्र गुरव तसेच इतर मान्यवरांनी हजेरी लावली. बंडू खंडागळे आणि नवल शेवाळे यांनी मुंबई आणि कोकण पट्ट्यातील बांधवांच्या समस्या मांडल्या. अलिबाग, रत्नागिरी मधील अनेक बांधवांनी त्यांच्या अडचणी विचारल्या. त्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली. समाजाच्या प्रश्नावर एवढी गंभीर चर्चा, आणि तेही भांडारकर प्राच्यविद्या संशोधन सारख्या संस्थेच्या आवारात यापूर्वी कधीही झाली नव्हती अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या