Thursday, September 19, 2024
police dakshta logo
HomeUncategorizedदोरीने गळफास घेत नशिराबादच्या तरुणाची आत्महत्या!

दोरीने गळफास घेत नशिराबादच्या तरुणाची आत्महत्या!

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जिल्ह्यात आत्महत्या आणि खुणांच्या घटना वाढल्या आहेत. जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावात राहणाऱ्या वीस वर्षीय तरूणाने घराच्या दुसऱ्या मजल्यावर जावून गळफास घेवून जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी आठ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धीरज प्रभाकर कोष्टी (वय २०) रा. नशिराबाद ता.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद शहरात धीरज कोष्टी हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. तो सध्या बीसीएचे शिक्षण घेत होता.शनिवार ८ जुलै रोजी सायंकाळी धीरज हा आपल्या आई वडील यांच्यासोबत होता. त्यानंतर त्याने राहत्या घरातील दुसऱ्या मजल्यावर जावून दोरीने छताला गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.जिल्ह्यात तरुणांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. आत्महत्या करण्याचे कारण अद्यापपावेतो समोर आलेले नाही. स्थानिक नागरिक आणि शेजारी राहणाऱ्या मित्रांनी धाव घेवून त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नम्रता यांनी त्यास मयत घोषीत केले. या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत दाणे आणि शरीफ शेख करीत आहेत. मयत तरुणाच्या पश्चात आई, वडील आणि तीन बहिणी असा मोठा परिवार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या