मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…
धरणगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह टीम:- धरणगाव येथे धक्कादायक अशी घटना घडली असून दुपाच्या २ वाजेच्या सुमारास नवऱ्याने संतापाच्या भरात पत्नी झोपेत असतांना तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात तिच्या पती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार धरणगाव तालुक्यातील हिंगोणे बु. येथे संतोष आखडू भिल हे आपल्या परिवारासोबत वास्तव्यास आहे. पती नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने गेल्या काही वर्षापासून पती व पत्नीमध्ये वाद सुरु होते. तो नेहमी पत्नीपासून वेगळा राहत होता. दि.३ एप्रिल रोजी भरदुपारच्या २.३० वाजेच्या सुमारास पत्नी मीराबाई भिल (वय 55) हे झोपलेले असतांना पती संतोष हा पत्नीच्या घरी आला व वाद करू लागला नंतर दुपारी पत्नी झोपलेले असतांना तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने पत्नी पूर्णपणे भाजली गेल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर यावेळी संतोष हा देखील थोड्या प्रमाणात भाजला गेला असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पुढील तपास सपोनि.जिभाऊ पाटील हे करीत आहेत.