धरणगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- धरणगाव येथील रहिवासी तसेच जम्मू श्रीनगर येथे कार्यरत किशोर पाटील यांचा कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने भारत मातेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. किशोर पाटील हे गेल्या बारा वर्षापासून सीआरपीएफ मध्ये देशाची सेवा करीत आहेत. देशाच्या सीमेलगत सेवा करीत असताना अनेक वेळा दहशतवादांशी लढले आहेत. नुकतेच ते गावी सुट्टीमध्ये आले होते. याच पार्श्वभूमीवर कर्तव्य बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील चौधरी यांनी भारत मातेची प्रतिमा देऊन सत्कार केला. यावेळी किशोर पाटील यांनी शत्रूंच्या कारवाई हाणून पाडण्यासाठी काय करावे लागते याचे अनेक किस्से सांगितले.कार्यक्रमास अनेक नागरिक ,पदाधिकारी उपस्थित होते.
धरणगाव येथील जवान किशोर पाटील यांचा सत्कार
RELATED ARTICLES