Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमधारावीत पित्याने दत्तक मुलीवर पेट्रोल टाकून पेटवून दिले

धारावीत पित्याने दत्तक मुलीवर पेट्रोल टाकून पेटवून दिले

मुंबई/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- मुंबईतील प्रसिद्ध धारावीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पित्याने आपल्या दत्तक मुलीवर पेट्रोल शिंपडून पेटवून दिल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये मोहिनी रामजीत ही 20 वर्षीय तरुणी 70 टक्के भाजली आहे.धारावी परिसरातील सायन हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये तिला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. धारावी पोलिसांनी आरोपी वडिलांना आयपीसीच्या कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत आधीच अटक केली होती, पण आता त्यामध्ये हत्येचे कलमही जोडले आहे. गेल्या आठवड्यात धारावी परिसरात तिच्या आई-वडिलांसोबत राहणाऱ्या २० वर्षीय मुलीला पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आले. यामध्ये मोहिनी 70 टक्के भाजली होती, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सायन हॉस्पिटलच्या बर्न वॉर्डच्या आयसीयूमध्ये दाखल असलेल्या मोहिनीचा शनिवारी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आरोपी वडिलांना बुधवारी पोलिसांनी कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत कलम लावला होता,नंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहिनी घराबाहेर बसली असताना मंगळवारी ही घटना घडली. वडील आणि मुलीमध्ये काही कारणावरून भांडण झालं होतं. भांडण इतकं वाढलं की वडील नंदकिशोर पटेल यांनी मोहिनीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं. या आगीत मोहिनी ७० टक्के भाजली होती. आई काजल जैस्वार (50) आणि कुटुंबीयांनी तिला गंभीर अवस्थेत सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.दरम्यान आरोपीस अटक करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या