पाचोरा/ प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- धावत्या रेल्वेतून उतरताना पाय घसरल्याने २९ वर्षीय तरुण रेल्वेखाली आला. त्यामुळे तब्बल आठ डब्बे तरुणाच्या अंगावरून निघून गेले. मात्र, सुदैवाने या घटनेत तरुण बचावला आहे ; ही घटना पाचोरा रेल्वे स्थानक येथे घडली आहे.डाव्या पायाची पाचही बोटे कापली गेली आहे. पाचोरा रेल्वेस्थानका नजीक ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तरुणावर पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, राहुल जयंत भदाणे (२९) रा. पळासखेडे ता. पारोळा हा तरुण सांगली येथे खाजगी कामानिमित्त गेला होता. दरम्यान ४ ऑगस्ट रोजी राहुल मंगला एक्स्प्रेसमध्ये बसला. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पाचोरा रेल्वेस्थानका नजीक मंगला एक्स्प्रेस धिम्या गतीने जात असतांना राहुल याने एक्सप्रेसमधुन उतरण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी राहुल याचा पाय घसरला व तो एक्स्प्रेसखाली सापडला. मंगला एक्स्प्रेसचे आठ डब्बे राहुल याचे अंगावरुन गेले. दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने तो बालंबाल बचावला आहे

