Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमधुळे येथील पं.स.च्या कनिष्ठ सहायकास लाच स्वीकारताना अटक

धुळे येथील पं.स.च्या कनिष्ठ सहायकास लाच स्वीकारताना अटक

धुळे/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- धुळे येथे लेखापरीक्षणाच्या नावाने बक्षीस म्हणून ३५०० रुपयांची मागणी करणाऱ्या कनिष्ठ सहाय्यक शामकांत सोनवणे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईमुळे धुळे पंचायत समितीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तक्रारदार हे पंचायत समितीत शाखा अभियंता पदावर आहेत.

येथील शाखा अभियंता पदावर कार्यरत असणारे शामकांत सोनवणे रत्नपुरा बीट बीटचे विभागीय लेखापरीक्षण झाले होते. बक्षीस म्हणून लाच मागितली जात होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असे सूत्रांनी सांगितले. कनिष्ठ सहाय्यक शामकांत हे लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. ही तक्रार धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देण्यात केली होती. तक्रारदार यांनी या झालेल्या लेखापरीक्षणाच्या नावाने दिलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता कनिष्ठ सहायक श्यामकांत सोनवणे तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे संपर्क साधला. तक्रारदार यांच्याकडे ३५०० रुपये लाचेची पंचासमक्ष मागणी करून लाचेची रक्कम तक्रारदार यांच्याकडुन स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. प्रत्यक्ष भेटून अथवा मोबाईलवर संभाषण करून देवपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या