Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeक्राईमनवलच..! नववधूने लग्न मंडपातून प्रियकरासोबत ठोकली धूम; सिनेस्टाईल घटनेची चर्चा रंगली...!!

नवलच..! नववधूने लग्न मंडपातून प्रियकरासोबत ठोकली धूम; सिनेस्टाईल घटनेची चर्चा रंगली…!!

वाशिम/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- एका नववधूने आपल्या होणाऱ्या पतीला सोडून प्रियकरासह मंडपातून धूम ठोकल्याची घटना रिसोड येथे रविवारी घडली. विदर्भातील या घटनेची एकच चर्चा रंगताना दिसत आहे.

रिसोड येथे विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वर आणि वधू पक्षाकडील मंडळी एकत्र आली होती. पूर्ण तयारी झालेली होती.पाहुणे रावळे यांची लगबग सुरू होती,सर्वत्र उत्साहाचे आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले होते. मेहकर येथील नवरदेव वाजत-गाजत आप्त-मित्र परिवारासह लग्नमंडपी जाण्यासाठी निघाला. वधूही सजून तयार झालेली होती. मात्र, लग्नाची घटिका येऊन ठेपली तरी वधू न आल्यामुळे शोध सुरू झाला. तेव्हा ती गायब असल्याचे लक्षात आले.तिने आपल्या प्रियकारासोबत रफुचक्कर केल्याची वार्ता कळल्यानंतर सगळेच वऱ्हाडी मंडळी अचंबित झाली. शोध घेतला असता ती निघून गेल्याचे समजले. दरम्यान या घटनेची चर्चा चांगलीच रंगली. वधू फ्रेश व्हायचे म्हणून स्वच्छतागृहाकडे गेली व तेथून प्रियकरासोबत पळाल्याचे वऱ्हाडींच्या लक्षात आले. अखेर हताश नवरदेव आपल्या पाहुण्यांसह आल्या पावली परत गेला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या