Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeजळगावनशिराबद येथील युवकांनी हिमालयात राबवली ट्रेकिंग मोहीम; सर्वत्र कौतुक....!

नशिराबद येथील युवकांनी हिमालयात राबवली ट्रेकिंग मोहीम; सर्वत्र कौतुक….!

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

जळगाव / कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/ पोलीस दक्षता लाईव्ह:– नशिराबाद चे मुळ रहिवासी असलेल्‍या 6 जणांनी आकुर्डी पुणे येथील निलेश इंगळे यांच्‍या नेतृत्‍वाखाली नेपाळमध्‍ये अन्‍नपूर्णा सर्कीट ट्रेक यशस्वी केला. सध्‍या शारिरीक फिटनेस ला खूप महत्‍व आले आहे. म्हणून सुरक्षितरित्‍या जवळपासचे पर्वत डोंगर चढणे हे आपल्‍या सर्वाना आवश्‍यक ठरते..ट्रेकिंगचा छंद जोपासत नशिराबाद येथील युवकांनी हिमालयात विविध भागात ट्रेकिंगच्या मोहीम राबवल्या. नेपाळमध्ये अन्नपूर्णा रेंज जवळील १८ हजार फूट उंच थोरांगला पास व तिलीचो लेक ही ठिकाणे फत्ते करण्यासाठी १ ते १६ एप्रिलदरम्यान मोहीम सुरू केली होती.

नशिराबाद येथील कलाप्रेमी सुभाष तळेले, किरण इंगळे, किशोर पाटील, सुनील पाटील व हेमराज चौधरी या तरुणांनी नीलेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली मोहीम सुरू केली. हे युवक अशा मोहिमेच्या निमित्ताने वर्षातून किमान एकदा तरी अशा प्रकारे ट्रेकिंगचे महत्त्व पटवण्याचा प्रयत्न करीत असतात. आणि अनेकांना आपला अनुभव सांगत इतरांना प्रेरणा देत असतात, त्यांच्या या मोहिमेचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.पोलीस दक्षता लाईव्हतर्फे सुद्धा या साहसी सहा तरुणांचे अभिनंदन व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या