Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeजळगावनशिराबादचे अनिल मोरे यांची कंट्रोल रूमला बदली; एमआयडीसी चे रामेश्वर मोताळे रुजू

नशिराबादचे अनिल मोरे यांची कंट्रोल रूमला बदली; एमआयडीसी चे रामेश्वर मोताळे रुजू

जळगाव/कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/ पोलीस दक्षता लाईव्ह:- जिल्ह्यातील सात पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी मंगळवारी काढले आहेत. अचानक बदल्यांचे आदेश काढण्यात आल्याने पोलीस विभागात वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे. नशिराबादचे कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी श्री.अनिल मोरे यांची कंट्रोल रूम ला (नियंत्रण कक्ष ) येथे बदली करण्यात आली आहे.

असे आहेत बदली झालेले अधिकारी….
फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांची नियंत्रण कक्षात विनंती बदली करण्यात आली आहे. त्यांनी याबाबत विनंती अर्ज दाखल केला होता.त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातील निलेश नानाजी वाघ यांची बदली करण्यात आली आहे.

कासोदा पोलीस ठाण्याच्या प्रभारी निता कायटे यांची एएचटीयू सेलमध्ये बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी एएचटीयू सेलच्या योगिता मधुकर नारखेडे यांची बदली करण्यात आली आहे.

नशिराबादचे अनिल छबू मोरे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी एमआयडीसीचे रामेश्वर दगडू मोताळे यांची बदली करण्यात आली आहे.

रावेरचे शीतलकुमार नाईक यांची मारवड पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तत्काळ पदभार घ्यावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या