जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- रोजी जळगाव येथे जिल्हाधिकारी श्री महाजन सर यांच्या हस्ते तहसीलदार श्री.लोखंडे साहेब यांच्या नैसगिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फार्म यांच्या तर्फे श्री.डॉ.किरण देविदास चौधरी यांना कृषि रत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुस्कार सोहळा पुण्यात अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आला होता. डॉ.किरण चौधरी यांनी प्रत्येक क्षेत्रात सर्व जातीय धर्माच्या लोकांच्या समस्यांचे निवारण करण्या करीता मोलाची कामगिरी बजावली आहे. घरगुती समस्या असो, शेती समन्या असो. पुलिस स्टेशनची असो गुरांची समस्या असो तसेच शोषित पीडित यांना न्याय मिळवून देण्याकरीता मोलाची कामगिरी वाजविली आहे. श्री. डॉ .किरण चौधरी यांच्या त्यांनी केलेल्या सामाजिक क्षेत्रातील तसेच त्यांच्या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन, यांना हा कृषीरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. ते एक गुरांचे डॉ.असुन त्यांना शेती मध्ये नवीन नवीन प्रयोग करून संशोधन करण्याची आवड आहे. खास करून ते कपाशीच्या पिकांवर गेल्या सात ते आठ वर्षापासून नवीन नवीन प्रयोग करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करीत असतात. आणि त्यांना त्यात मोठे यशही येत असते, यामुळेच त्यांना ह्या पुरस्कारासाठी सन्मानित करण्यात आले असून त्यात त्यांच्या सामजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा देखील विचार केला गेला.
आज प्रथम विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांना पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.तसेच श्री.डॉ.किरण देविदास चौधरी यांना उपजिल्हा अधिकारी श्री.प्रविण महाजन, यांच्या तर्फे सन्मानित करण्यात आले. मा.आ.सुरेश भोळे (राजु मामा) जळगांव विधान सभा, श्री.ठाकरे (जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी) जळगाव मा.श्री.संतोख बिठवई (जिल्हा उपनिबंधक जळगांव) मा.पंकज लोखंडे ( तहसिलदार) जिल्हा अधिकारी कार्यालय जळगांव, तसेच प्रमुख उपस्थित म्हणुन गोरख देवरे (नॅशनल डायरेक्टर जनरल MHRPCF) मा.प्रकाश पाटील (महाराष्ट्र निरिक्षक – HHRPCF) मा अनिल टपके (नॅशनल क्राईम इन्वेस्टिगेशन ब्यूरो महाराट्र राज्य. मा.प्रफुल पाटील उत्तर महाराष्ट्र मा.डॉ. शरीफ बागवान (जिल्हा अध्यक्ष HHRPCPI) यांची प्रमुख उपस्थिती होती पुरस्कार मिळाल्या नंतर डॉ.किरण देविदास चौधरी यांचे नशिराबाद परिसरामध्ये सर्व समाजातून अभिनंदन केले जात आहे.