Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमनशिराबादच्या पेठ भागात दोन गटात तुफान हाणामारी ,३ जखमी ,शांतता प्रस्थापित...

नशिराबादच्या पेठ भागात दोन गटात तुफान हाणामारी ,३ जखमी ,शांतता प्रस्थापित…

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

जळगाव/ कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/ पोलीस दक्षता लाईव्ह:- नशिराबाद येथील गावाच्या शेवटच्या रहिवासी वस्तीत हसण्यावरून शिवीगाळ केल्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. लोक नाट्यच्या चर्चेवरून हा वाद व हाणामारी उद्भभवली असे बोलले जात आहे,या हाणामारीत तीन व्यक्ती जखमी झाले आहेत.सध्या या परिसरात वातावरण शांततामय असल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी परस्पर विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात सोमवारी १० एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावातील पेठ भागात पाहून हसल्याच्या कारणावरून शिवीगाळ केल्याने दोन गटात एकमेकांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी ९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली होती ; या हाणामारीत गणेश देविदास धनगर (वय २४), ज्ञानेश्वर (वय-२४), दिलीप नाथ (वय-२३) आणि कमलेश दिलीप नाथ हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. यात गणेश देविदास धनगर याने दिलेल्या फिर्यादीवरून रोहित दिलीप नाथ, भावलाल दिलीप नाथ, अवि दिलीप नाथ, दिलीप काशीनाथ नाथ यांच्या , विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तर दुसऱ्या गटातील ज्ञानेश्वर दिलीप नाथ याने दिलेल्या फिर्यादीवरून गणेश देवीदास धनगर, देवा देविदास धनगर, आबा पांडूरंग धनगर, बापू पांडूरंग धनगर, देवा देविदास धनगर, आबा पांडूरंग धनगर, बापू पांडूरंग धनगर, पांडूरंग धनगर आणि लक्ष्मीबाई धनगर यांच्या विरोधात सोमवारी १० एप्रिल रोजी दुपारी २ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान पेठ भागात काल काहीशी तणावपूर्ण वातावरण तयार झाले होते ,मात्र आज दि.११ एप्रिल रोजी त्या पेठ भागात पूर्णतः शांतता दिसत आहे. नशिराबद गावात आधीपासूनच सलोख्याचे संबंध जोपासले जात असून शांतता प्रस्थापित होण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य मिळत असते पोलिसांना नेहमीच सहकार्याची भावना दाखवली जात असते .पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव आणि पोहेकॉ युनुस शेख करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या