Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानशिराबादच्या स्वयंशोध फाउंडेशनतर्फे १८५ विद्यार्थ्यांचा गुणगौरव

नशिराबादच्या स्वयंशोध फाउंडेशनतर्फे १८५ विद्यार्थ्यांचा गुणगौरव

नशिराबाद/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- नशिराबाद-वार्षिक सण 2022 23 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना फाउंडेशनतर्फे प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मान्यवरांनी कौतुकाची थाप देऊन शैक्षणिक मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी डॉ.उल्हास पाटील लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ.नयना झोपे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून व्हीजन अकॅडमीचे संचालक अनिल माला,माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. तिलक नारखेडे माजी सरपंच पंकज महाजन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

१८५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये नशिराबाद पंचक्रोशीतील भादली जळगाव खुर्द, सुनसगाव, वराडसिम, नशिराबाद, आसोदा येथील १८५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून प्रशस्तीपत्र देण्यात आले. यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कोलते उपाध्यक्ष पवन तिडके सचिव धीरज सैतवाल सदस्य किशोर पाटील ,तुषार रोटे,दिनेश सावळे,अक्षय घुमरे ,प्रशांत मुळे नरेंद्र धर्माधिकारी योगेश बाविस्कर निरज चितोडे, राहुल चौधरी चेतन सपकाळे एकनाथ कोष्टी यांनी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मेहनत घेतली. फाउंडेशनचे उपसचिव अनिल चौधरी यांनी सूत्रसंचालन संचालन केले तर आभार सचिव धीरज सैतवाल मानले. अध्यक्ष योगेश कोलते यांनी प्रास्ताविक केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या