नशिराबाद/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- नशिराबाद येथील ग्रामपंचायत (सन २०१७-१८ ते २०१८-१९ ) या कालखंडातील १४ वा वित्त आयोग निधी योजनेअंतर्गत नशिराबाद येथे सर्व सोयींयुक्त अशा भव्य प.पू.झिपरू अण्णांच्या उद्यानाची उभारणी करण्यात आलेली आहे.
प.पू.श्री.झिपरू अण्णा महाराज पुण्यतिथी उत्सवाचे औचित्य साधून पुण्यतिथीच्या पूर्वसंधेला झिपरू अण्णांच्या उद्यानाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हा समारंभ पार पडणार आहे. हा सोहळा १२ मे शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता प.पू.श्री झिपरू अण्णा महाराज उद्यान, आय.टी.आय. जवळ, नशिराबाद येथे होणार आहे. तरी सदर कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ,असे आवाहन नशिराबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रविद्र सोनवणे आणि प्रशासक नामदेव पाटील यांनी केले आहे.