नशिराबाद/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा परिषद उर्दू शाळा नशिराबाद येथे कवायत, देशभक्तीपर गीत गायन आदी उपक्रमांचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले. देशभक्ती विषयी आपली भावना प्रकट करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने अतिशय स्तुत्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. देशाचे भविष्य असणाऱ्या या पिढीचा सर्वांगीण विकास साधणारा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा एक अविस्मरणीय ध्वजारोहनाचा कार्यक्रम जिल्हा परिषद उर्दु शाळा नशिराबाद येथे पार पडला. श्री.गणेश भाऊ चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्या वेळी कार्यक्रमाला अध्यक्ष अमीनोद्दीन शमशोद्दीन, राष्ट्रवादी काँग्रेस चे बरकतअली युसुफअली, शाहीन.बी.सलीम शाह, शाहीन परवीन शेख शब्बीर, यास्मीन शेख महेबुल, यास्मीन बी नजाकत अली, मोहम्मद खान रशीद खान, सगीरा खालून रिजवान खान, तस्लीम बी.मुश्ताक खान, मुम्ताज बी शेख सलीम, सादीक खान जमशेर खान, शेख जुनेद रऊफ, सैय्यद नाज़ीम अली लियाकत अली, शेख आसीफ शेख अहेमद, नज़र मोहम्मद सैफुद्दीन शेख इत्यादी उपस्थित होते.