मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…
नशिराबाद/ प्रतिनिधी /पोलीस दक्षता लाईव्ह:- नशिराबाद येथील पेठ भागांमध्ये गेल्या 30 वर्षापासून अखंडितपणे सुरू असलेला अखंड हरिनाम संगीत सप्ताह यावर्षी उत्साहात पार पडला. गेल्या २० एप्रिल रोजी सप्ताहाची सुरुवात झाली. त्या दिवसापासून नियमितपणे सकाळी ६ वा दरम्यान काकडा आरती दुपारी ३ ते ५ या वेळेत हरिपाठ व रात्री ८ वा. श्रीमद् भागवत संगीत कथा प्रवचनकार, तसेच भागवतकार ह.भ.प. भागवत देशमुख महाराज यांचे श्रीमद् भागवत संगीत कथा प्रवचन असे रोजच्या कार्यक्रमाचे स्वरूप होते. गेल्या सप्ताहापासून गावात संगीतमय वातावरण निर्माण झाले होते. गावातील भाविकांमध्ये भक्तिमय उत्साह पहावयास मिळत होता.
आज दि.२७ रोजी अखंड हरिनाम संगीत सप्ताहाचा समारोप पार पडला. त्यावेळी सकाळी ९ वा. गावातून दिंडी काढण्यात आली. दिंडी निमित्त गावात सजावट करण्यात आली होती. महिलांनी दिंडी मार्गावर रांगोळ्या काढून दिंडी दिंडी मार्गाची शोभा वाढविली. लहान मुला मुलींनी विविध प्रकारची वेशभूषा केली तसेच महिलांनी फेटे परिधान करून दिंडीमध्ये सहभाग घेतला. महिलांनी पावल्या खेळून व फुगडी खेळून दिंडी सोहळ्याचा आनंद घेतला. दिंडी सोहळा पार पडल्यानंतर काल्याचे किर्तन पार पडले. काल्याचे किर्तन कीर्तनकार ह.भ.प.गु.श्री.भरत महाराज श्री.क्षेत्र कुंडलेश्वर बेळी यांनी केले. त्या नंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला उपस्थित सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन गावातील महिला भजनी मंडळ व धुमधडाका मित्र मंडळ यांनी केले. त्यासाठी त्यांना गावातील ग्रामस्थांचा सहवास लाभला.