Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeक्राईमनशिराबाद येथे गोमांस विक्रीची माहिती दिल्याच्या संशयावरून तरुणास बेदम मारहाण..

नशिराबाद येथे गोमांस विक्रीची माहिती दिल्याच्या संशयावरून तरुणास बेदम मारहाण..

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…
जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव येथील नशिराबाद येथे गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना दिल्याने तरुणास मारहाण झाल्याची घटना घडली असून घटनेवेळी पोलिसांना सुद्धा धक्काबुक्की झाल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक माहिती नुसार नशिराबाद गावातील मन्यार मोहल्ला येथे गोमांस विक्री होत असल्याची माहिती सागर पुरूषोत्तम कापुरे (वय ३२) रा.जुने जळगाव याने नशिराबाद पोलीसांना दिली. या बाबत संबंधितांना संशय आला व या संशयावरून सोमवारी ३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता नशिराबाद येथील शेख मुस्ताक शेख मुसा कुरेशी, जमील अहमद शेख मुसा कुरेशी, आरिफ खान तसलीम खान, आरीफ खान याची आई आणि त्यांच्या बरोबर असलेला एक अनोळखी व्यक्ती यांनी सागर कापुरे याला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. त्यावेळी कर्तव्यावर असलेले सहाय्यक फौजदार हसमत अली बशीर अली सैय्यद आणि पोलीस नाईक सुधीर रघुनाथ विसपुते भांडण सोडविण्यासाठी आले असता यांना देखील धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी सकाळी १० वाजता शेख मुस्ताक शेख मुसा कुरेशी, जमील अहमद शेख मुसा कुरेशी, आरिफ खान तसलीम खान, आरीफ खान याची आई आणि एक अनोळखी व्यक्ती सर्व रा.नशिराबाद ता. जि. जळगाव यांच्या विरोधात नशिराबाद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या