नशिराबाद/प्रतिनिधी सुनील महाजन/पोलीस दक्षता लाईव्ह:- वन्यजीव संरक्षण जळगाव संस्थेचे सदस्य सर्पमित्र तुषार रंधे यांनी माजी जिल्हा उपाध्यक्ष लालचंद भाऊ पाटील यांना भेटून आपली व्यथा मांडली.त्यांनी सर्प हे विविध जातीचे असतात, व त्यांना पकडण्यात अडचणी निर्माण होतात. प्राणी पक्षांना सुद्धा कोणत्याच गोष्टीचा आधार न घेता त्यांना सतत धडपड करावी लागते. या गोष्टींसाठी आमच्या कडे साहित्याची कमी असून, माझी आपल्याकडे अशी मागणी आहे की, तुम्ही आम्हाला किट उपलब्ध करून दिले तर जेणे करून आमच्या सर्प मित्रांचे आपल्या मदतीमुळे संरक्षण होईल. या मागणीकडे लालचंद पाटील यांनी क्षणाचा विचार न करता सर्प मित्रांना लागणाऱ्या साहित्याची विचारपूस करून, नशिराबाद येथील सर्पमित्रांना हुक(स्टिक), दोन बॅग, एक टॉर्च इत्यादी सामान, किट उपलब्ध करून दिल्या. कारण या संस्थेचे जे सभासद आहेत ते जीवाची परवा न करता प्राणी, पक्षी, विषारी सर्प यांना वाचवण्यासाठीचे कार्य निस्वार्थी पणे करत असतात. नशिराबाद परिसरातील काही आजूबाजूच्या गावांमधील सुद्धा सर्प निघाल्याचे कॉल सर्प मित्रांच्या मोबाईल वर येत असतात. त्वरित माहिती मिळताच सर्पमित्र तुषार रंधे, अमित सोनवणे, लोकेश नेरकर, सागर भोई, विनायक सोनटक्के हे मदतीस धावून जात असतात. ही सर्व टीम सर्प मित्र जनजागृती चे उत्तम कार्य करीत आहे.
नशिराबाद येथे वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सभासदांना जि.प. उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्या तर्फे साहित्य वाटप
RELATED ARTICLES

