Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यानागपूरच्या " वारकरी मंच " संस्थेला स्वामीरत्न पुरस्कार जाहीर

नागपूरच्या ” वारकरी मंच ” संस्थेला स्वामीरत्न पुरस्कार जाहीर

पुणे/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- संदेश स्वामींचा व स्वामीरत्न पुरस्कार २०२३ हा सोहळा ३० मे रोजी होणार आहे ,असे आयोजकांनी कळविले आहे. सामाजिक तथा आध्यात्मिक क्षेत्रात करीत असलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत समर्थनगरी प्रतिष्ठान अक्कलकोट संचलित अध्यात्मिक राज्यस्तरीय समिती संस्थेच्यावतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय स्वामीरत्न पुरस्काराकरिता वारकरी मंच महाराज राज्य नागपूर या संस्थेची निवड करण्यात आली आहे.

दिनांक ३० मे २०२३ रोजी श्री महेश कल्याणराव इंगळे (अध्यक्ष श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट) व वे. शा. सं. अन्नू महाराज (श्री स्वामीभक्त चोळप्पा महाराज वंशज, समाधी मठ अक्कलकोट) यांच्या हस्ते आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात येणार आहे. या सोहळ्यास उपस्थित अनेक प्रतिष्ठित मंडळी उपस्थित राहणार आहे.सदर समारंभ मंगळवार, दिनांक ३० मे २०२३ वेळ सायंकाळी ४ वाजता अण्णाभाऊ साठे सभागृह, स्वामी विवेकानंद पुतळ्या शेजारी, बिबवेवाडी, सातारा रोड, पुणे येथे संपन्न होणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या