धुळे/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- महाराष्ट्र शासनाच्या मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धा 2022- 23 करिता धुळे केंद्रावरून सादर झालेल्या “लोक मंगल कलाविष्कार सहकारी संस्था,धुळे यांच्या “प्रतिकार” अनिल सोनार लिखित नाटक प्रेक्षकांना खूपच भावले. नाटकाला सुगीचे दिवस यावे यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे नाट्यकला प्रेमींचे म्हणणे आहे. कलाकार केतकी पंच यांना तर,मानवता बहुउद्देशीय विकास संस्था ,धुळे यांच्या बबन प्रभू लिखित “पळा पळा पुढे कोण पळे तो” या नाटकातील संदीप पाचंगे यांना काल नाशिक येथे झालेल्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या विभागीय पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये उत्कृष्ट अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.
नाट्य कलाकार पाचंगे यांचा नाशिक येथे जाहीर सन्मान
RELATED ARTICLES