Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeजळगावनाबार्ड ' तर्फे १५ एप्रिलपासून खान्देश पापड महोत्सव

नाबार्ड ‘ तर्फे १५ एप्रिलपासून खान्देश पापड महोत्सव

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह….

जळगाव / नेहा राणे / पोलीस दक्षता लाईव्ह:- सध्या सर्वत्र विविध प्रकारचे पापड बनवण्याचा मोसम सुरू असून महिलांची चांगलीच लगबग दिसून येत आहे.राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्यावतीने गेल्या १४ वर्षांपासून ‘खान्देश पापड महोत्सवाचे’ आयोजन होत आहे. या महोत्सवाचे यंदाही १५ ते १७ एप्रिल दरम्यान सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत लेवा बोर्डिंग,जी.एस.ग्राऊंड समोर,जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांच्या हस्ते पापड महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे , असे आयोजकांच्यावतीने कळविण्यात आले आहे.

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) चे सहाय्यक महाव्यवस्थापक श्रीकांत झांबरे, बँकेचे संचालक सतीश मदाने, हरिश्चंद्र यादव, ललित चौधरी, सुशील हासवाणी, हिरालाल सोनवणे, संचालिका डॉ.आरती हुजुरबाजार, संध्या देशमुख,माजी संचालिका तसेच विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभा पाटील, माजी संचालिका सावित्री सोळुंखे, विंदा नाईक, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील, उपमुख्यकार्यकारी अधिकारी संजय नागमोती, महाव्यवस्थापक सुनील अग्रवाल, उपमहाव्यवस्थापक नितिन चौधरी आदी याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
या पापड महोत्सवात सुमारे ५० बचत गटांचा सहभाग आहे. येथे पापड, कुरडई, नागलीपापड, शेवया, हातशेवया ,उपवास पापड, मुखवासचे विविध प्रकार,नैसर्गिक प्रकारची हळद, इ. सर्व वस्तू तसेच इतर गृहपयोगी साहित्य उपलब्ध असतील. महिला बचत गटांना प्रशिक्षण देणे आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच बचत गटांच्या विविध वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने बँकेने राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या सहकार्याने या देखण्या बाजारपेठेचे आयोजन केले आहे. पापड महोत्सवास नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन जळगाव जनता सहकारी बँकेच्यावतीने करण्यात आले आहे ,दरवर्षी या महोत्सवाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतो असे आयोजकांनी सांगितले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या