Sunday, July 13, 2025
police dakshta logo
HomeUncategorizedनाशिकचे शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ.गोसावी यांचे निधन

नाशिकचे शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ.गोसावी यांचे निधन

नाशिक/,प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.मो. स. गोसावी (वय ८८) यांचे रात्री निधन झाले. आज रविवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या मागे मुले शैलेश आणि कल्पेश आणि कन्या डॉ. दीप्ती देशपांडे असा परिवार आहे.कमी वयात महाविद्यालय प्राचार्य म्हणून गोसावी यांची निवड झाली होती. याबद्दल कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी केलेले कौतुक ते आवर्जून सांगत. श्रीमद्भगवद्गीतेचे ते अभ्यासक होते. गीता, ज्ञानेश्वरी याविषयक पुस्तके त्यांनी लिहली आहेत.काही वेळापूर्वी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बीवायके महाविद्यालयात ठेवले जाणार आहे. तर सायंकाळी साडे पाचला नाशिक येथील अमरधाम येथे पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या