Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमनिमड्या येथील खून प्रकरण; सहा संशयित ताब्यात,पोलिस बंदोबस्त कायम..

निमड्या येथील खून प्रकरण; सहा संशयित ताब्यात,पोलिस बंदोबस्त कायम..

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…
जळगाव/कार्यकारी संपादक तूषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- रावेर तालुक्यातील निमड्या येथे काल तरुणाचा खून झाल्याची घटना घडल्याने परिसर हादरला आहे.दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून सहा संशयितांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.

 

हा परिसर आदिवासी भाग आहे. निमड्या परिसरात काल सकाळी संजय पावरा ( वय 3३१ ) या तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. त्याला दगडाने ठेचून ठार मारल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते. रावेर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली.

यात सदर तरूणाच्या मोबाईलवरून करण्यात आलेल्या कॉल्सचे विवरण पाहून पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी सुरू करण्यात आलेली आहे.या हत्येमागे काय कारण असावे ? खून का करण्यात आला याची माहिती घेतली जात आहे तर, दुसरीकडे तरुणाच्या खून झालेल्या ठिकाणाला अप्पर पोलीस अधीक्षक श्री.गवळी यांनी भेट दिली असून निमड्या गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या