Thursday, September 19, 2024
police dakshta logo
HomeUncategorized'न्यू इंग्लिश स्कूल' नशिराबाद येथे अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा..

‘न्यू इंग्लिश स्कूल’ नशिराबाद येथे अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा..

नशिराबाद/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- नशिराबाद शिक्षण मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व किमान कौशल्य विभागाच्या वतीने शाळेत अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी ७.२० मिनिटांनी संस्थेचे संचालक आदरणीय श्री. राजू पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर इयत्ता दहावीच्या सर्व स्काऊट- गाईडच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचालन करून ध्वजाला मानवंदना दिली व पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी उच्च माध्यमिक विभागातील प्राध्यापक आदरणीय श्री.आर. ओ.चौधरीसर यांनी’ स्वातंत्र्य दिन व मेरी माटी मेरा देश ‘या विषयावर भाषण केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. ‘ मेरी माटी मेरा देश ‘ या उपक्रमांतर्गत स्वातंत्र्यदिनी शाळेमध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व किमान कौशल्य विभागात निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या तसेच पर्यावरण समितीतर्फे शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. वेशभूषा स्पर्धेमध्ये प्राथमिक विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध स्वातंत्र्यसेनानीच्या वेशभूषा केल्या होत्या. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळेतील इयत्ता ९ वी ‘ क’ विद्यार्थ्यांनी शाळेच्या ग्रंथालयासाठी ‘आम्ही जिंकू शकता ‘व ‘माती पंख आणि आकाश ‘ही पुस्तके शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती .एस ए. बनसोडे मॅडम यांच्याकडे सुपूर्द केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील उपशिक्षक श्री. ए. डी. चौधरी सर यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.योगेश पाटील सर, उपकार्याध्यक्षा आ. श्रीमती प्रमिला यशवंत महाजन, अध्यक्ष आ. डॉ.श्री.विकास नथू चौधरी, उपाध्यक्ष श्री.विनायक वासुदेव वाणी, सचिव श्री.मधुकर नारायण चौबे, संचालक डॉ.संदीप महाजन,श्री.भोजुदादा पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. एस.ए.बनसोडे मॅडम प्राथमिक मुख्याध्यापक प्रविण महाजन सर व पर्यवेक्षिका सौ .एस.वाय.पाटील मॅडम प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व किमान कौशल्य विभागातील सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या