धुळे/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- पळासनेर (ता. शिरपूर, जि. धुळे) येथे मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा येत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ठाणे गुन्हे शाखा पोलिसांनी पळासनेर येथे सापळा रचत संशयिताला अटक केली.
त्याच्याकडून २० गावठी बनावटीचे पिस्तूल, एक गावठी बनावटीची मशिनगन, दोन मॅग्झिनसह २८० जिवंत काडतुसे जप्त केली. मध्यप्रदेशातील उमरठी गावाच्या परिसरात बनावट मशिनगनसह इतरही हत्यारे तयार केली जात असल्याचे मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे उघडकीस आले आहे. सुरजितसिंग उर्फ माजा आवसिंग (वय २७ रा. मु. उमरठी, मध्यप्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे.महाराष्ट्र व मध्यप्रदेश च्या सीमेवर नेहमी शस्त्रसाठा मिळून येत असतो. पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

