Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावपाचोरानजीक ट्रॅक्टरचे टायर फुटून ट्रॅक्टर पलटी: एक युवक ठार

पाचोरानजीक ट्रॅक्टरचे टायर फुटून ट्रॅक्टर पलटी: एक युवक ठार

भडगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- भडगाव-गिरणा नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने वाहन महामार्गावरील खांबावर आदळल्याने ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाच्या डोक्याला जबरी मार लागला. त्यात २० वर्षाचा युवक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान भडगाव रोडवरील हाॅटेल स्वप्नशिल्प समोर घडली. या घटनेप्रकरणी पाचोरा येथील ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.जिल्ह्यात चोरटी वाळू वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून या प्रकाराकडे पोलीस व महसूल विभाग दुर्लक्ष करत आहे,यात चिरीमिरी होत असल्याची शंका अनेकांनी व्यक्त केली आहे. मयत युवकाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केल्यानंतर मयतावर चिंचखेडा खु” येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण गाव शोकाकुल झाले होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या