Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeक्राईमपाडळसेत एका प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

पाडळसेत एका प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

पाडळसे ता.यावल/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- यावल तालुक्यातील पाडळसे या गावातील एका प्रौढाने आपल्या राहत्या घरी छताला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यावल तालुक्यातील पाडळसे या गावातील विलास मोतीराम तायडे (वय ५१) वर्ष यांनी घरात छताला साडी बांधून साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी फैजपूर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस रवींद्र मोरे हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या