Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeजळगावपिंप्राळातील चाकू हल्ल्यात एक जखमी

पिंप्राळातील चाकू हल्ल्यात एक जखमी

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव शहरातील पिंप्राळा येथे किरकोळ कारणावरून तिघांनी एकाला मारहाण करून चाकूने वार करून जखमी केल्याची घटना शनिवार, रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नीलेश दुबे हे पिंप्राळा येथे कुटूंबियांसह राहायला आहे. शनिवारी रात्री ते फुले मार्केट येथे खरेदीला गेले होते. रात्री ९.३० वाजता कुटूंबासह घरी परतल्यावर त्यांना घराच्या बाहेर वाळूच्या ढिगा-यावर तीन अज्ञात तरूण बसलेले दिसून आले. तुम्ही कोण आहात, इथे का थांबले आहे, अशी विचारणा करून नीलेश हे घरामध्ये गेले. तेव्हा तिघांमधील एकाने त्यांना बाहेर बोलवून तू आम्हाला का बोलला असे म्हणत वाद घातला. इतर दोघांनी नीलेश यांना पकडून मारहाण करण्यास सुरूवात केली. तेवढयात एकाने चाकू काढून नीलेश यांच्या पायावर वार करून खिश्यातील १५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून नेला. दरम्यान आरडा-ओरड झाल्याने तिघांनी तेथून पळ काढला. लागलीच नीलेश यांच्यासह कुटूंबियांनी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी सांगितल्यानुसार जिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर नीलेश दुबे यांनी रात्री रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार तीन जणांविरोधात गुन्हयाची नोंद करण्यात आली.पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या