Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeक्राईमपिस्टलचा धाक दाखवून भुसावळात व्यापाऱ्याला लुटले

पिस्टलचा धाक दाखवून भुसावळात व्यापाऱ्याला लुटले

भुसावळ/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.किराणा मालाच्या होलसेल व्यापार्‍याला पिस्टलाच्या धाकावर लुटण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास आठवडे बाजारात घडली. सुदैवाने व्यापार्‍याकडील रोकड बचावली आहे.

या घटनेत मात्र आरोपींनी व्यापार्‍याच्या गळ्यातील चैन हिसकावून घेण्यात आली. मात्र त्यातील अर्धा भागच आरोपींच्या हाती लागल्याने तोच घेवून त्यांनी दुचाकीवरून पळ काढला. या घटनेने शहरातील व्यापार्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठचे प्रभारी निरीक्षक गजानन पडघण आणि बाजारपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचार्‍यांनी धाव घेत घडलेला प्रकार जाणून घेतला.
भुसावळ शहरातील आठवडे बाजारात मोहनलाल चावरीया यांचे गणेश ट्रेडर्स नामक दुकान आहे.ते होलसेल किराणा मालाचे पुरवठादार आहेत. नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांनी दुकान बंद केले. आणि घरी जायला निघाले तो पर्यंत तोंडाला मास्क लावून आलेल्या 25 ते 30 वयोगटातील तरुणांनी व्यापार्‍याला गावठी कट्टा व चाकूचा धाक दाखवत त्यांना धमकावले व त्यानंच्याकडील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला, मात्र बॅग हाती न आल्याने व्यापार्‍याच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावण्यात आली. मात्र त्यातही चैनचा अर्धाच भाग हाती आल्यानंतर आरोपींनी दुचाकीवरून पलायन केले. या प्रकारानंतर काही वेळ सदर व्यापारी भांबावून गेला. मार्केटमध्ये घटना कळताच व्यापारी देखील धास्तावले आहेत. भुसावळ शहरात अनेक प्रकारचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या