Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्यापोलीस भरतीच्या सरावाला गेलेली तरुणी अचानक गायब; शोधाशोध सुरू

पोलीस भरतीच्या सरावाला गेलेली तरुणी अचानक गायब; शोधाशोध सुरू

सातारा/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याच्या उत्तर भागात असणाऱ्या तोंडले- डांगेवाडी गावातील शिवानी श्रीमंत डांगे ही पोलीस भरतीच्या व्यायाम सरावासाठी जाते, असे घरी सांगून गेली. मात्र, ती पुन्हा घरी आलीच नसल्याने गावात एकच गोंधळ उडाला आहे.

याबाबत माहिती अशी की, सध्या सर्वत्र पोलीस, सैन्य भरतीमुळे गावोगावी मुले- मुली अकॅडमीच्या माध्यमातून व्यायामाचा सराव करण्यात मग्न आहेत. शिवानी डांगे ही दहिवडी येथील एका अकॅडमीमध्ये सराव करत होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या पोलीस भरतीत तिने सहभाग घेतला होता. मात्र, तिची निवड न झाल्याने ती पुन्हा सरावाला लागली होती. सराव करत असताना तिच्यासोबत मैत्रिणीदेखील असायच्या. रोज व्यायाम करून सात वाजता घरी यायच्या, पण शुक्रवारी पहाटे नियमितपणे ती सरावाला जाते, असे सांगून गेली अन परत घरी आलीच नाही. त्यामुळे घरातील लोकांनी सरावाला जाणाऱ्या परिसरात तिचा शोध घेतला, पण ती सापडली नाही. त्यामुळे मुलीचा चुलत भाऊ विशाल किसन डांगे याने दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये शिवानी हरवल्याची तक्रार दिली आहे. तिच्या अंगामध्ये निळा शर्ट,काळी पॅन्ट, काळे बूट असा वेश आहे. कोणाच्या निदर्शनास आली, तर तात्काळ दहिवडी पोलीस ठाणेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी केले आहे. पण ती अचानक गेली कुठे? असे झाले काय? हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या