Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावप्रख्यात आयटी तज्ज्ञ, वक्ते ,लेखक व पत्रकार उदय निरगुडकर यांची व.वा.वाचनालयास सदिच्छा...

प्रख्यात आयटी तज्ज्ञ, वक्ते ,लेखक व पत्रकार उदय निरगुडकर यांची व.वा.वाचनालयास सदिच्छा भेट

जळगाव/ विशेष प्रतिनिधी – प्रख्यात व्यक्तिमत्त्व उदय निरगुडकर यांनी आज प्रसिद्ध वल्लभदास वालजी वाचनालय येथे सदिच्छा भेट दिली.
श्री.निरगुडकर हे टाटा, गोदरेज यांसारख्या कंपन्यांमध्ये २० हून अधिक वर्षे आयटी तज्ज्ञ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करीत आले आहेत. ३० ऑक्टोबर २०१७ पर्यंत ते दूरचित्रवाणीच्या झी २४ तास वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक होते. ते एक पत्रकार, वक्ते आणि लेखक आहेत. ,जळगाव येथे आले असता त्यांचे वल्लभदास वालजी वाचनालयाचे संचालक व लेखक प्रभात चौधरी ,
,कार्याध्यक्ष अनिल शहा,शुभदा कुलकर्णी,डॉ.शिल्पा बेंडाळे यांनी स्वागत केले. जळगावबद्दल आणि सांस्कृतिक ,साहित्य या विषयावर मनमोकळेपणाने चर्चा झाली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या