Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याप्रत्येक कुटुंबास घरगुती कचरा कुंडी उपलब्ध व्हावी;प्रहार जनशक्ती पक्षाचे निवेदन

प्रत्येक कुटुंबास घरगुती कचरा कुंडी उपलब्ध व्हावी;प्रहार जनशक्ती पक्षाचे निवेदन

नशिराबाद/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- नशिराबाद-प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने नशिराबाद नगरपरिषद मुख्याधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत.

गावातील प्रत्येक कुटुंबास कचरा विघटित करण्यासाठी ओला कचरा सुका कचरा यासाठी घरगुती कचरा कुंडी उपलब्ध करून स्वच्छ भारत अभियान यास हातभार म्हणून सहकार्य मिळावे यासाठी निवेदन देण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्षाचे जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष मोहन माळी यांनी निवेदन दिले.
लवकरात लवकर यावर विचार करून डसबिन वाटप करण्याबाबत सकारात्मक विचार करू असे मुख्याधिकारी यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या