Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeक्राईम....फक्त स्विफ्टडिझायर कार चोरून मौजमजा करणाऱ्या परप्रांतीय टोळीचा पर्दाफाश; आरोपी शिरूर पोलिसांच्या...

….फक्त स्विफ्टडिझायर कार चोरून मौजमजा करणाऱ्या परप्रांतीय टोळीचा पर्दाफाश; आरोपी शिरूर पोलिसांच्या ताब्यात…!

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

पुणे / कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे / पोलीस दक्षता लाईव्ह:- शिरूर ( पुणे ) केवळ स्विफ्ट डिझायर कार चोरी करणारी टोळी पुणे पोलिसांनी पकडली असून वाहनधारकांत समाधानाचे वातावरण पसरले आहे .दरम्यान सदर हे आरोपी शिरूर पोलिसांच्या ताब्यात आहेत. ते चोरटे पुण्यात यायचे, कार चोरायचे आणि चेन्नईत नेऊन विकायचे आणि त्या पैशांवर ते मौजमजा करत असायचे.चोरटे हे शिक्षित असल्याची माहितीही पोलिसांनी प्रतिनिधीस दिली. यानंतर पोलिसांनी याप्रकरणाचा कसून शोध सुरु केला.अनेक ठिकाणी ते चौकशी करीत होते. सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले. विशेष म्हणजे हे चोरटे केवळ स्विफ्ट कार चोरायचे,अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

स्विफ्ट कार चोरणाऱ्या परप्रांतीय टोळीचा पर्दाफाश करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी अनेकांनी पुणे पोलिसांचे कौतुक देखील केले आहे. चोरट्यांकडून ३० लाखांचा मुद्देमाल आणि इतर वस्तू हस्तगत करण्यात आला आहे. पुण्यात गाड्या चोरून परराज्यात नेऊन विकल्या जात होत्या.ही ४ ते ५ जणांची टोळी होती.पुणे ग्रामीण पोलिसांनी चेन्नईत जाऊन चार जणांना ताब्यात घेतलं आहे. राजा कल्याण सुंदराम, रविंद्रम गोपीनाथम, यादवराज शक्तीवेल, आर सुधाकरन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी सध्या शिरूर पोलिसांच्या ताब्यात आहेत.चोरटे
फक्त स्विफ्ट कार चोरी करायचे,गेल्या चार महिन्यात पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून स्विफ्ट डिझायर कार चोरी झाल्याचे एकूण पाच गुन्हे दाखल झाले होते.या घटनेने कार मालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.
अचानक सुरू झालेल्या या कार चोरीच्या सत्रात फक्त स्विफ्ट डिझायर कार चोरी जात असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी तपास करत प्रथमच चोरीच्या गाड्या खरेदी करणाऱ्यांना चेन्नई येथून अटक केली. चोरी गेलेल्या स्विफ्ट डिझायर कार चैन्नई येथून जप्त करत ३० लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी चेन्नईतून आरोपींना पकडले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील चोरीस गेलेली वाहने ही अहमदनगर मार्गे संभाजीनगरकडे जात होती असे निदर्शनास आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये निष्पन्न झाले. गुप्त माहितीद्वारे चोरी गेलेली वाहने तामिळनाडू राज्यातील चेन्नई शहरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शिरूर विभागाच्या तपास पथकाने चेन्नई येथे जाऊन आरोपींना ताब्यात घेत, चोरीला गेलेल्या गाड्या आणि मुद्देमाल जप्त केला.पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या