Sunday, July 13, 2025
police dakshta logo
HomeUncategorizedफूड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थिनीची संभाजीनगरात आत्महत्या

फूड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थिनीची संभाजीनगरात आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- फूड टेक्नॉलॉजीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवार सायंकाळी पाचच्या सुमारास सुरेवाडी हर्सूल येथे उघडकीस आली. परीक्षेत कमी मार्क पडल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिया रमेश बुजाडे (वय २१, सुरेवाडी, हर्सूल) असे गळफास घेऊन आयुष्य संपवलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. प्रियाचे वडील व्यापारी आहेत.आई गृहिणी आहे. तिला मोठी बहीण तर एक लहान भाऊ आहे. सोमवारी दिवसभर घरच्यांसोबत घरी असताना सायंकाळी डोकं दुखत असल्याचे कारण सांगून ती बेडरूममध्ये गेली. काही वेळाने घरच्यांनी तिला हाक मारली; मात्र तिचा प्रतिसाद आला नाही. खोलीचा दरवाजाही आतून बंद असल्याने कुटुंबीयांनी नातेवाइकांच्या मदतीने दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला असता प्रियाने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. तिला तत्काळ औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या