Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeक्राईमफेकरी येथे जुन्या वादातून खून; एकास अटक

फेकरी येथे जुन्या वादातून खून; एकास अटक

भुसावळ/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- भुसावळ काही दिवसांपूर्वी आते भावाला कानशिलात लगावल्याचा राग मनात धुमसत ठेवला होता. अशातच मध्यरात्री तो तरुण डोळ्यासमोरून जात असताना संशयित तरुणाला राग आला. त्याने त्या तरुणाला थांबवले. शिवीगाळ केली. त्यांच्यात झटापट झाल्या आणि शेवटी संशयित तरुणाने त्या तरुणाला जवळच्या दुचाकीवर जोरात ढकलून दिले. यामुळे तो दुचाकीवर आपटला जाऊन जोरात खाली पडला. त्याच्या डोक्याला मार लागला. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या खुनाच्या गुन्ह्याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. संशयित तरुणाला अटक करण्यात आली आहे. मंगल शांताराम शेळके ,वय 23 वाल्मीक नगर, फेकरी ता.भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी एका लहान मुलीला संतोष लक्ष्मण बावस्कर या व्यक्तीने हाताला चावले होते. या लहान मुलीचा मयत मंगल शेळके हा नातेवाईक आहे. मंगलने त्यावेळी संतोष बाविस्कर याला मुलीच्या हाताला का चावला म्हणून जाब विचारला होता. त्यावेळी मंगलने संतोष बाविस्करच्या कानशिलात लगावली होती. त्यावेळी संशयित राहुल तुकाराम पाडळे (वय २७, रा. फेकरी) याने तेथे येऊन माझ्या आत्याभावाला संतोषला कानात का मारले म्हणून विचारणा केली. तसेच तुला पाहून घेईन अशी धमकी मंगलला राहलने दिली होती.पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या